गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेल्या गुढीची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

गुढीपाडव्याच्या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्‍वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटीने अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्‍वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.


Multi Language |Offline reading | PDF