(म्हणे) ‘मी हिंदू किंवा मुसलमान यांच्यासाठी नाही, तर देशासाठी काम करतो !’ – पंतप्रधान मोदी

  • ‘देशातील एक घटक भारताचे अन्न खातो; मात्र निष्ठा पाकिस्तानशी ठेवतो’, हे हिंदू आणि मुसलमान यांना समान मानणारे मोदी यांना ठाऊक आहे का ? हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे ! हिंदूंसाठी काम केले की, ते देशासाठीच होते आणि अन्य कोणासाठी केले, तर ‘ते देशासाठीच होईल’ याची शाश्‍वती देता येणार नाही. 
  • देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक असूनही त्यांना अल्पसंख्यांकांना असणार्‍या सुविधा मिळत नाहीत. मोदी यांनी खरेच देशवासियांसाठी काम केले असते, तर हिंदूंवर ही स्थिती ओढवली नसती !
  • ‘हिंदूंची स्थिती सुधारण्यासाठी मोदी काही तरी करतील’, या भावनेने हिंदूंनी मोदी यांना सत्तेवर बसवले होते; मात्र मोदी यांनी ५ वर्षांत हिंदूंसाठी काहीही केले नाही. ते का केले नाही, हेच या उत्तरातून स्पष्ट होते !

नवी देहली – जेव्हा सच्चर समितीचा अहवाल आला होता, तेव्हाही मला विचारण्यात आले होते, ‘तुमचे मुसलमानांशी कसे संबंध आहेत ?’ तेव्हा मी सांगितले होते की, मी केवळ मुसलमानांसाठी किंवा हिंदूंसाठी काही करत नाही, तर गुजरातच्या नागरिकांसाठी (त्या वेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.) काम करतो आणि आताही माझे तेच उत्तर आहे की, मी हिंदू किंवा मुसलमान यांच्यासाठी नाही, तर भारतियांसाठी काम करतो, त्यांच्यासाठी योजना आणतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. (पंतप्रधान प्रजेकडे समानदृष्टीने पहातात, तर काश्मीरमधील साडेचार लाख हिंदू अजूनही विस्थापित का आहेत ? मदरशांना अनुदान दिल्यावर तेथून सुशिक्षित, राष्ट्रप्रेमी आणि निधर्मी नागरिक निर्माण होतील, याची निश्‍चिती मोदी देतील का ? चर्च संघटनांनी भाजपला मते देऊ नयेत; म्हणून ख्रिस्ती धर्मियांना आवाहन केले होते, हे मोदी विसरले का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF