गुढीपाडव्याला धर्मसंस्थापनेचे ऐतिहासिक कार्य करण्याचा संकल्प करा !

गुढीपाडव्यानिमित्त संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘गुढीपाडवा हा सनातन धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी शुभसंकल्प केले जातात. सध्याच्या धर्मग्लानीच्या काळात धर्माची पुनर्स्थापना होण्यासाठी प्रयत्न करणे, हाच खरा शुभसंकल्प ठरतो. सध्याच्या काळात धर्मसंस्थापना म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे. हे कार्य भविष्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार असल्याने या गुढीपाडव्याला करावयाच्या प्रत्येक कृतींमधून धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक संकल्प करा !

१. अभ्यंगस्नान : वातावरणातील धर्मग्लानीचा मळ नष्ट करण्याचा संकल्प करून मांगलिक स्नान करा !

२. तोरण लावणे : समाजात धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक धर्मजागृतीचे तोरण लावण्याचा निश्‍चय करा !

३. संवत्सरपूजन : भावी हिंदु राष्ट्रात हिंदु कालगणना पद्धत असेल. त्यामुळे व्यक्तीगत जीवनात संवत्सरपूजन म्हणून प्रतिदिन इंग्रजी कालगणनेनुसार नव्हे, तर हिंदु तिथीनुसार आचरण करण्याचा संकल्प करा !

४. गुढीपूजन : पृथ्वीवर अधर्माचा नाश करून सनातन धर्माची गुढी उभारण्याचा कृतसंकल्प करा !

५. पंचांगश्रवण : धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी ‘प्रत्येक तिथी शुभ आहे’, हा भाव ठेवून पंचांगश्रवण करा !

६. कडनिंबाचे सेवन : धर्मसंस्थापनेचे कार्य करतांना नकळत घडलेल्या वाईट कृत्यांच्या विस्मरणासाठी कडुनिंबाचे सेवन करा !

७. भूमी नांगरणे : पृथ्वीवर हिंदु राष्ट्र सांभाळू शकणार्‍या सात्त्विक पिढीचे पालनपोषण व्हावे, यासाठी सात्त्विक पीक मिळावे, यासाठी भूमीवर नांगर घाला !

८. दान : वर्ष २०२३ मध्ये येणार्‍या हिंदु राष्ट्रासाठी सत्पात्र व्यक्तींना दान करण्याचा संकल्प आजपासून करा; कारण कालमहिम्याप्रमाणे हिंदूंना मिळणारे धर्मराज्य हे उपभोगण्यासाठी नाही, तर समाजव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी आहे. सत्पात्र व्यक्तीच हे शिवधनुष्य पेलू शकतात. धर्मसंस्थापनेचे कार्य केल्यानंतर मिळणार्‍या फळाचा त्याग करण्याचा संकल्प करणे, हेच गुढीपाडव्याचे खरे दान होय.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now