गुढीपाडव्याला विविध संकल्प करून कृतीशील नववर्षारंभ साजरे करूया !

‘शक’कर्त्या राज्यकर्त्यांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याची प्रतिज्ञा करा !

‘महाराज युधिष्ठिर, पैठणचा नृपती शालिवाहन, उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी राजे ‘शककर्ते’ म्हणून इतिहासात सुप्रसिद्ध आहेत. मुसलमानांनी भारतावर १ सहस्र वर्षे राज्य केले, तरी पारतंत्र्यातील हिंदु समाजाने कधीही हिंदु कालगणनेचा त्याग केला नाही किंवा ‘हिजरी सन’ ही इस्लामी कालगणना स्वीकारली नाही. इंग्रजांनी भारतावर केवळ १५० वर्षे राज्य केले. या काळात इंग्रजांनी केलेल्या बौद्धिक आक्रमणामुळे भारतियांनी प्राचीन हिंदु कालगणना त्यागून इंग्रजी कालगणना स्वीकारली. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाहीने ७१ वर्षांच्या इतिहासात हिंदु कालगणना पुुनर्स्थापित करणारा एकही तेजस्वी ‘शक’कर्ता राज्यकर्ता दिला नाही !

ही धर्मग्लानी रोखण्यासाठी भारतभूमीतील अस्मिताशून्य राज्यकर्ते आणि त्यांनी चालू ठेवलेली इंग्रजी कालगणना हटवून प्राचीन भारतीय कालगणना पुनर्स्थापित करण्याची धमक असलेल्या नव्या ‘शक’कर्त्या राज्यकर्त्यांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होणे आवश्यक आहे.’

अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुखसमृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्‍चय करा !

मानवाने सुखीसमाधानी जीवन जगण्याचा प्रारंभ भारतापासून करावा लागेल. याचा पहिला टप्पा म्हणजे हिंदु धर्माचा द्वेष करणार्‍या भारतातील ‘अधर्मी’ राज्यप्रणालीची पाळेमुळे खणून हिंदुहित जपणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आणि घरोघरी अध्यात्मप्रसार करणे, हा होय. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्माचा प्रसार करणे सुलभ होईल. त्यामुळे मानवजातीला १००-२०० वर्षांनी हिंदु धर्म कळला, असे न होता एका पिढीतच, म्हणजेच २५-३० वर्षांतही कळेल. म्हणजेच पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करण्याचे कार्य होऊ शकेल.

हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नाही, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून रामराज्यातील नागरिकांप्रमाणे अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुखसमृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्‍चय करूया !

दुर्बल हिंदु समाजाला संघटित आणि बलशाली करण्याच्या कार्यास आरंभ करा !

काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांत हिंदू नावालाही शेष नाहीत. हिंदूंचा हा भौगोलिक पराभव आहे. हिंदु समाज संघटित नसल्याने देशभरात उसळणार्‍या दंगलींमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या वस्त्यांचा पाडाव होत आहे. उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यांत ‘भूमी जिहाद’मुळे (‘लँड जिहाद’मुळे) हिंदूंच्या वस्त्या युद्धनीतीदृष्ट्या हरल्यातच जमा आहेत. प्रतिवर्षी लक्षावधी हिंदूंचे होत असलेले धर्मांतर, हा हिंदूंचा धार्मिक पराभव आहे.

अश्‍वं नैव गजं नैव याघ्रं नैव च नैव च । अजापुत्रं बलिं दद्याद्देवो दुर्बलघातकः ॥

अर्थ : घोडा, हत्ती अथवा वाघ यांचा बळी दिला जात नाही. बकर्‍याचा मात्र दिला जातो. देवसुद्धा दुर्बळाच्या बाजूने उभा राहू शकत नाही.

म्हणूनच हिंदूंनो, दुर्बल हिंदु समाजाला संघटित आणि बलशाली करण्याच्या कार्यास आरंभ करा ! स्वरक्षणविद्या शिकवणारी केंद्रे उभारून त्याद्वारे हिंदु समाजाचे सशक्तीकरण करा !

हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्मजागृती करण्यासाठी परिणामकारक प्रयत्न करा !

आज हिंदूंवर चहूबाजूंनी आक्रमणे चालू आहेत. ही आक्रमणे वरकरणी स्थुलातील वाटत असली, तरी त्यामागे खरे कारण मात्र अनिष्ट शक्तींचे प्राबल्य असणे होय. या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी जागृत व्हायला हवे. हिंदूंना जागृत करायचे झाल्यास धर्मजागृतीसाठी प्रयत्न करायला हवेत; कारण धर्मजागृती हीच खर्‍या अर्थाने हिंदुजागृती होय. त्यासाठी धर्म म्हणजे काय ? धर्मजागृती म्हणजे काय ? धर्माचे पालन कसे करावे ? इत्यादी गोष्टी हिंदूंनी समजून घ्यायला हव्यात. कर्मकांड आणि उपासनाकांड ही धर्माची दोन प्रमुख अंगे आहेत. यांमध्ये आज बहुतांश हिंदू कर्मकांडाचे पालन करतात; कारण कलियुगात सर्वांना ते सहजसुलभ वाटते. आज मात्र हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने कर्मकांडाचे पालन परिपूर्ण आणि भावपूर्ण रितीने होत नाही. साहजिकच करणार्‍याला त्याची फलप्राप्ती होत नाही. त्याची श्रद्धा ढळू लागते. सर्व हिंदूंनी धर्माचरण केल्यास त्यांचे आध्यात्मिक बळ वाढेलच, तसेच समष्टी सात्त्विकता, म्हणजे समाजाची सरासरी आध्यात्मिक पातळीही वाढेल.

गुढी उभारण्याचा खरा आनंद मिळवण्यासाठी ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापणे अत्यावश्यक !

धर्मशास्त्रानुसार गुढी हे विजयासमवेतच आनंदाचे प्रतीकही आहे. रावणाचा वध करून प्रभु श्रीराम अयोध्येत परतले, त्या दिवशी ‘रामराज्या’ला आरंभ झाला. त्या ‘आनंदाचे प्रतीक’ म्हणूनही अयोध्येत गुढ्या उभारल्या गेल्या.

हिंदूंनी गुढ्या उभारण्याच्या धर्मशास्त्रातील या भावार्थांचा काळानुरूप अन्वयार्थ काढला पाहिजे. श्रीरामाने रावणाला पराभूत केले, तसे हिंदूंनी भ्रष्टाचारी, धर्मद्रोही अधर्म्यांना पराभूत केले पाहिजे, तरच विजयाची गुढी उभारण्यात अर्थ आहे. दुसरे म्हणजे, गुढी ‘रामराज्या’त उभारण्याला महत्त्व आहे. ‘रामराज्या’च्या तुलनेत सध्याचे निधर्मी राज्य हे ‘रावणराज्य’च ठरते ! गुढी उभारण्याचा खरा आनंद मिळवायचा असेल, तर हिंदूंनी रामराज्याची अनुभूती देणारे ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापणे अत्यावश्यक आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now