गुढीपाडव्याचे महत्त्व

सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य पुष्कळ वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी

गुढीपाडव्याच्या दिवशी तेज आणि प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य पुष्कळ वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते आणि आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.

प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण

सर्वसाधारण व्यक्तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता पुष्कळ अल्प असते. खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.

१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणे

२. गुरु आणि ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे

३. ईश्‍वराची संकल्प शक्ती कार्यरत असणे

४. शक्तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रजापति लहरींसमवेतच यम लहरीही कार्यरत असतात.

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ घट्यांंत वातावरणात अनिष्ट शक्ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात अनिष्ट शक्ती प्रवेश करू शकतात. त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.

आंब्याच्या पानांचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळ्या पानांत ३० टक्के, तर आंब्याच्या परिपक्व पानांत १० टक्के असते. कोवळ्या पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर करावा.

कडुनिंबाच्या पानांचे महत्त्व

गुढीला कडुनिंबाची माळ घातली जाते. कडुनिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडुनिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. जिवाला कडुनिंबाच्या पानांच्या माध्यमातून सूक्ष्म-रूपाने प्रजापति लहरी मिळत असतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now