स्वर्गलोकातील गुढी

कु. मधुरा भोसले

देवासूर संग्रामात देवता विजयी झाल्यावर देवसैनिक सोन्याच्या काठीला रेशमी वस्त्रे लावून त्यावर सोन्याचा गडू ठेवतात. गुढीच्या अस्तित्वामुळे संपूर्ण वातावरणात आणि वातावरणात वावरणार्‍या जिवांवर गुढीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा अधिक प्रमाणात लाभ होतो. त्या अनुषंगाने श्रीविष्णूने देवसैनिकांना युद्धाच्या प्रत्येक स्तरावर लाभ होण्यासाठी युद्धाला जाण्यापूर्वी, युद्धाच्या वेळी आणि युद्धसमाप्तीनंतर विविध प्रकारच्या गुढ्या नेण्यास सांगितल्या. त्याप्रमाणे त्या नेल्या जातात.

स्वर्गलोकातील गुढी आणि पृथ्वीवरील गुढी यांतील भेद

देवतांमध्ये भाव असल्यामुळे आणि स्वर्गलोकातील वातावरण सात्त्विक अन् चैतन्यमय असल्याने गुढीला केवळ वस्त्र लावल्यानेही गुढीत उच्च लोकांतून प्रक्षेपित होणार्‍या लहरी आकृष्ट होतात. तसेच देवतांना त्याचा लाभ होतो. गुढीतील देवत्वाचा सन्मान करण्यासाठी काही वेळा गुढीला पुष्पहार वहातात. पृथ्वीवरील वातावरण रज-तमात्मक असल्याने आणि पृथ्वीवासियांचा ईश्‍वराप्रती भाव न्यून असल्याने गुढीला कडुनिंबाची पाने अन् बत्ताशांची माळ घालावी लागते. पृथ्वीवरील गुढीच्या तुलनेत स्वर्गलोकातील गुढीत २० टक्के अधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण होते आणि त्याचे प्रक्षेपण होण्याचे प्रमाणही १० ते १५ टक्के इतके अधिक असते.

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २९.३.२००६)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now