काश्मीरमध्ये निवडणुकीच्या काळात आतंकवादी आक्रमणाची शक्यता

  • आतंकवाद्यांच्या छायेखाली निवडणूक पार पडणे, हे भाजपच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
  • अशा वेळी मतदानकेंद्रांची सुरक्षा वाढवणे, पोलिसांची अधिक कुमक ठेवणे यांसारख्या वरवरच्या उपाययोजना केल्या जातात. त्याऐवजी असे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचणार्‍या आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर आक्रमण करून त्यांचा पूर्ण निःपात करण्याची बुद्धी भाजपच्या शासनकर्त्यांना होईल, तो सुदिन !

नवी देहली – गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात आतंकवादी आक्रमणाची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया रहित होण्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांनी काही गट बनवले आहेत. यात अफगाणिस्तानमधील आतंकवाद्यांचाही समावेश आहे.

ते स्फोटकांचे तज्ञ असल्याची माहिती मिळाली आहे. ते मतदानकेंद्रे आणि उमेदवार यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुकीच्या सुरक्षेसाठी तैनात असणार्‍या सुरक्षादलांवरही आक्रमणाची शक्यता आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये निवडणूक होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे.

कटरा येथे अतीदक्षतेची चेतावणी

माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र असणार्‍या कटरा शहरामध्ये २ संशयित आतंकवादी दिसल्याने येथे अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. तसेच येथे शोधमोहीम चालू करण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now