कांकेर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात बीएस्एफ्चे ४ सैनिक हुतात्मा 

  • गेल्या ५ दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात आणू न शकणारी लोकशाही आता पुरे !
  • आतंकवाद्यांच्या पाठोपाठ आता नक्षलवाद्यांच्या हातून सैनिक ठार होत असतांना नक्षलवाद्यांचा निःपात करण्यासाठी भाजप सरकार कशाची वाट पहात आहे ?

कांकेर (छत्तीसगड) – येथे नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएस्एफ्च्या) वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा झाले, तर २ जण घायाळ झाले. ही घटना महला या गावामध्ये घडली. येथून हा ताफा जात असतांना हे आक्रमण करण्यात आले.

१. सीमा सुरक्षा दलाची ११४ वी बटालियन गस्तीसाठी निघाल्यानंतर काही वेळातच नक्षलवाद्यांनी यावर आक्रमण केले. सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या वेळी ४ सैनिक हुतात्मा झाले.

२. नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यातील महला गावाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरक्षादलांकडून नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला लक्ष्य करण्यासाठी हे आक्रमण घडवून आणण्यात आल्याचे सुरक्षायंत्रणांचे म्हणणे आहे.

३. कांकेर लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिलला मतदान होणार आहे. नक्षलवाद्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. कांकेरच्या काही भागात या संदर्भातील भित्तीपत्रकेही लावण्यात आली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF