केरळमध्ये राहुल गांधी यांच्या निवडणूक फेरीत मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांचा चांदतारा असणार्‍या हिरव्या झेंड्यासह सहभाग

  • भारताची फाळणी होण्यास गांधीसह मुस्लिम लीगही तितक्याच प्रमाणात उत्तरदायी आहे. अशा भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी पक्षाशी हातमिळवणी करणार्‍या काँग्रेस पक्षाला हिंदूंनी या निवडणुकीत त्याची जागा दाखवून द्यावी !
  • राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी पक्ष लोकांच्या माथी मारणारी लोकशाही आता पुरे !

वायनाड ( केरळ) – येथून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ४ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला. यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका वाड्रा यांनी निवडणूक फेरी (रोड शो) काढली. या वेळी काँग्रेसचे मित्रपक्ष सहभागी झाले होते. त्यात ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ या धर्मांध पक्षाचाही समावेश होता. या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात चांदतारा असणारे त्यांच्या पक्षाचे हिरवे झेंडे होते. यामुळे काँग्रेसवर सामाजिक माध्यमातून टीका होत आहे. याविषयी मुस्लिम लीगचे सरचिटणीस के.पी.ए. मजीद म्हणाले की, राहुल गांधी यांच्या दौर्‍याच्या वेळी आमच्या झेंड्याला वा चिन्हाला दूर ठेवण्याविषयी काहीही निर्णय झालेला नव्हता. पक्षाने त्याच्या स्थापनेपासूनचा हिरव्या झेंड्याचा अभिमानाने वापर केलेला आहे.

(हिंदूंची मते मिळणार नसल्यामुळे काँग्रेस आता देशद्रोही, धर्मांध, हिंदुद्वेषी यांना खुश करून त्यांची मते लाटण्याचा प्रयत्न करत आहे ! अशा राष्ट्रघातकी पक्षाने भारतावर अधिक काळ राज्य केले, हे संतापजनक होय ! – संपादक)

१. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे वायनाड जिल्हा उपाध्यक्ष टी. महंमद यांनी म्हटले की, आम्ही नेहमीच धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांना प्राधान्य दिले आहे. (याचे एकतरी उदाहरण आहे का ? – संपादक)

२. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते पक्षाचा झेंडा ‘पाकिस्तानी मुस्लिम लीग’च्या झेंड्याशी मिळता जुळता असल्याने तो पालटण्याच्या विचारात आहेत, असे वृत्त प्रसारित झाले होते; मात्र इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते ई.टी. महंमद बशीर यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. (यातून हा पक्ष कोणाशी एकनिष्ठ आहे, हे सांगायला नको ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF