भारत पुढील ४ वर्षांत अत्याधुनिक हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र बनवणार

भारतीय शास्त्रज्ञ देशाच्या संरक्षणासाठी विविध शस्त्रे आणि अस्त्रे बनवत आहेत; मात्र तरीही मूठभर आतंकवादी देशाला डोईजड होत आहेत आणि शासनकर्ते त्यांना मुळासकट नष्ट करण्यात अपयशी ठरले आहेत !

नवी देहली – डीआरडीओ पुढील ४ वर्षांत ध्वनीच्या ५ पट क्षमतेने वेगवान मारा करणारे हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र भारतात बनवणार आहे. आतापर्यंत जगात कोणत्याही देशाकडे असे क्षेपणास्त्र नाही. भारतासमवेतच अमेरिका, चीन आणि रशिया हे ३ देशही यावर काम करत आहेत, अशी माहिती ‘डीआरडीओ’चे महासंचालक डॉ. एस्.व्ही. कामत यांनी वैज्ञानिक परिसंवादाच्या वेळी दिली.

डॉ. कामत पुढे म्हणाले की,

१. नौदलाची शक्ती वाढवण्यासाठी नवीन ‘सोनार’ यंत्रणा बनवण्याचे काम चालू आहे. सध्या समुद्रात खोल पाण्यामध्ये शत्रूची पाणबुडी कार्यरत असल्यास ती ‘रडार’वर दिसावी, अशी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे सोनार यंत्रणेद्वारे शत्रूच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. पाणबुड्यांची ओळख केवळ त्याच्या आवाजावरून केली जाते. सोनार यंत्रणा शत्रूच्या पाणबुड्यांच्या इंजिनच्या आवाजावरून त्यांचा शोध घेऊ शकणार आहे.

२. जगातील केवळ ५ देशांकडे टॉर्पिडो (खोल समुद्रामध्ये पाणबुड्यांना उद्ध्वस्त करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र) बनवण्याची क्षमता आहे. या सूचीत भारताचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF