पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर !

पाकच्या अर्थमंत्र्यांची स्वीकृती

पाक आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर होणार असला, तरी त्याची आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याची आणि त्यांना भारतात कारवाया करण्यास पाठवण्याची खोड जाणार नाही. आर्थिक कारणामुळे पाकचे तुकडे झाले, तरी तेथील धर्मांधांची  भारताच्या विरोधातील वळवळ बंद होणार नाही, हेही लक्षात ठेवायला हवे !

असद उमर

इस्लामाबाद – पाकिस्तानवर इतके कर्ज झाले आहे की, तो आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे स्पष्ट विधान पाकचे अर्थमंत्री असद उमर यांनी केले आहे. येथे सामाजिक माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या संदर्भात झालेल्या प्रश्‍नोत्तराच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. आशियाई विकास बँकेनेही म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०१८ मध्ये पाकिस्तानचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ५.२ होते, ते वर्ष २०१९ मध्ये ३.९ वर येण्याची शक्यता आहे.


Multi Language |Offline reading | PDF