अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या दोषींची निर्दोष सुटका

सत्र न्यायालयाचा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने पालटला

  • सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालय रहित करते, याचाच अर्थ प्रत्येक न्यायालय कायद्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढते, असे समजायचे का ?
  • चुकीचे निर्णय दिल्यामुळेे पीडितांवर अन्याय होतो. त्यामुळे चुकीचे निर्णय दिले जाऊ नयेत, यासाठी न्याययंत्रणा काही प्रयत्न करणार का ? ‘असे केल्यास निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही’, असे जनतेला वाटते !

मदुराई (तमिळनाडूू) – थेनी येथील ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर १ डिसेंबर २०१४ या दिवशी बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ३ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने रहित करून आरोपींची मुक्तता केली. या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याएवढे पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच या आरोपींना योग्य कायदेशीर साहाय्य मिळाले नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने म्हटले की, डीएन्ए नमुन्यांच्या निष्कर्षावरून या प्रकरणात आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत नाही. सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा साक्षीदार आणि पंचायतीने दिलेल्या साक्षी यांवर आधारित आहेत.  साक्ष देणारे पीडितेचे नातेवाईक आणि पंचायतीचे सदस्य हे गावातीलच असल्याने साक्षीच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देऊन गावातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न दिसत आहे. आरोपींना बचावाची संधीही देण्यात आली नाही. राज्य सरकारने पीडितेच्या आईला ५ लाख रुपयांची हानीभरपाई द्यावी.


Multi Language |Offline reading | PDF