इस्लामी देश ब्रुनेईमध्ये समलैंगिकांना दगडाने ठेचून ठार करण्याचा कायदा संमत

भारतात समलैंगिक संबंधांचा विरोध झाल्यावर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध करणारे यावर काहीच बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !

बांदर सेरी बेगावन (ब्रुनेई) – इस्लामी देश ब्रुनेईमध्ये समलैंगिक संबंध बनवल्याचे दोषी आढळल्यास दगडाने ठेचून मृत्यूदंड दिला जाण्याच्या कायद्याला संमती देण्यात आली आहे. या देशात चोरांचे हात कापले जातात. ‘ब्रुनेईमध्ये इस्लामिक कायदे आणखी प्रभावीपणे लागू करण्यासाठी माझा प्रयत्न राहील’, असे ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया यांनी स्पष्ट केले आहे.

१. एखाद्या व्यक्तीने समलैंगिक संबंध बनवल्याची स्वीकृती दिल्यानंतर अथवा त्यांना असे करतांना रंगेहात पकडल्यानंतर शिक्षा दिली जाणार आहे. ब्रुनेईमध्ये यापूर्वीच समलैंगिक संबंधांवर बंदी होती. जुन्या कायद्यानुसार समलैंगिकांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जात होती.

२. ४ लाख २० सहस्र लोकसंख्या असलेल्या या देशातील दोन तृतीयांश नागरिक मुसलमान आहेत. या देशात १९५७ पासून आतापर्यंत कुणालाही मृत्यूदंडाची अंमलबजावणी झालेली नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now