हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला पोलीस कोठडी

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

खासगी कंत्राटदाराकडून पुलाची संरचनात्मक पडताळणी चालू असतांना प्रत्यक्ष उपस्थित असणे, कामाच्या नियमित पडताळणीकडे लक्ष ठेवणे, हाताखालील अभियंते उपस्थित आहेत का, ते नेमून दिलेली कर्तव्य चोखपणे बजावत आहेत का, याकडे लक्ष देणे अभियंत्यांना बंधनकारक होते. या कामामध्ये पाटील यांनी कुचराई केली, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच कामाची पडताळणी करणारे नीरज देसाई यांच्या अधिवक्त्यांनी ‘पोलीस देसाई यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप केला. यांच्या जामीन अर्जावर सुनावणी चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF