पाकमध्ये २ हिंदु मुलींच्या अपहरणाची चौकशी करण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून आयोगाची स्थापना

अशा आयोगांचा काहीही लाभ होणार नाही. ‘आम्ही हिंदूंसाठी काही तरी करतो’, हे दाखवण्यासाठी पाक अशा प्रकारे आयोग स्थापन करून जगासमोर स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे ! हे लक्षात घेऊन आता भाजप सरकारने पाकमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !

Two Hindu teenage girls of 12 and 14 were allegedly kidnapped, forcibly married off and converted to Islam on the eve of Holi in Pakistan.

इस्लामाबाद – पाकच्या सिंध प्रांतात २ हिंदु मुलींचे अपहरण, त्यांचे धर्मांतर आणि नंतर मुसलमानांशी विवाह करण्याच्या नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने याविषयी चौकशीसाठी ५ सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. न्यायालयाने म्हटले की, हे धर्मांतर बलपूर्वक झाले कि नाही, हे पहाणे आमचे काम आहे.


Multi Language |Offline reading | PDF