जवाहर नवोदय विद्यालयाने हिंदूंच्या ‘गुढीपाडवा’ या नववर्षाच्या दिवशी ठेवलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलावी !

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

यवतमाळ, ३ एप्रिल (वार्ता.) – केंद्रशासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने हिंदूंच्या ‘गुढीपाडवा’ या हिंदु नववर्षाच्या (६ एप्रिल) दिवशी ठेवलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ एप्रिलला पाठवण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. ललित कुमार वराडे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, सनातन संस्थेचे श्री. पांडुरंग पिल्लेवार, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF