सेवांतर्गत आश्‍वासीत प्रगती योजनेचा लाभ आयुर्वेद महाविद्यालयांतील कर्मचार्‍यांना का नाही ?

नागपूर खंडपिठाची राज्य सरकारला नोटिसीद्वारे विचारणा !

नागपूर – राज्य सरकारच्या विविध विभागांतील तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना लागू केलेल्या सेवांतर्गत आश्‍वासीत प्रगती योजनेचा लाभ आयुर्वेद महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचार्‍यांना का देण्यात आला नाही ?, अशी विचारणा करणारी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने सरकारला बजावली आहे. त्यावर ४ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आयुर्वेद महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी कृती गटाने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली, तेव्हा राज्य सरकारच्या वित्त, वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेद संचालनालय यांना नोटीस बजावण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now