खोटे चमत्कार दाखवून धर्मांतर करणार्‍या धर्मगुरूंचे निवडणुकीसाठी आशीर्वाद घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार !

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतल्याचे छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे. यामध्ये ख्रिस्ती धर्मगुरु फादर डॉ. पिटर सिल्व्हा यांनी पार्थ पवार यांच्या डोक्यावर हात ठेवल्याचे दिसते. पीटर सिल्व्हा ही व्यक्ती ‘जिझसचे नाव घेतल्याने हृदयरोग बरा होतो’ असे चमत्कारिक दावे करत धर्मांतराला प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे पुरोगामित्वाचा ढोल बडवणार्‍या पक्षाच्या उमेदवाराकडून असे झाल्याने याविषयी सामाजिक प्रसारमाध्यमांतून पार्थ पवार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पुरोगामित्वाचा ढोल पोकळ असल्याचे समोर आल्याने ढोल बडवणारेही गप्प आहेत. हिंदुत्वनिष्ठांवर, हिंदु धर्मावर टीका करणारे नेते याविषयी काही बोलणार नाहीत. तथाकथित पुरोगामित्व जपणार्‍या अंनिसने आचारसंहितेचा भंग करणार्‍या, तसेच अंधश्रद्धा पसरवणारे फादर सिल्व्हा यांना अटक करवून दाखवावी आणि अशांना प्रोत्साहन देणार्‍या नेत्यांवरही कारवाई करण्याची मागणी करावी. हिंदूंसमोर मात्र हा पोकळ ढोल फाटला आहे, हे नक्की !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now