अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मागणी !

मंगळुरू येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मंगळुरू – देशात अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची प्रकरणे यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला अश्‍लील संकेतस्थळे हे एक मुख्य कारण आहे. या अश्‍लील संकेतस्थळांवरून अश्‍लील चित्रपट, ऑनलाईन वेश्याव्यवसाय, अनैतिकता आणि गुन्हेगारी यांविषयीचे प्रसारण केले जाते. समाजाला घातक असणार्‍या या संकेतस्थळांवर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी  हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड समन्वयक श्री. चंद्र मोगेर यांनी येथे केली. मंगळुरू येथे हिंदु संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. देशात प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावला आहे. पेट्रोल, डिझेल यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. अशा दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.


Multi Language |Offline reading | PDF