धानोरा (नंदुरबार) येथे ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या फसव्या नावाने हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र !

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा कार्यक्रमाला तीव्र विरोध

  • जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन

भाजप शासनाने देशभर चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी काहीही प्रयत्न न केल्याचा हा परिणाम आहे ! गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदु ‘धर्मांतरविरोधी कायदा’ अस्तित्वात येण्याची मागणी करत असूनही ती विचारात न घेणारे उदासीन सरकार ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

हिंदूंची फसवणूक करणारे कार्यक्रमाचे हस्तपत्रक

नंदुरबार, १ एप्रिल (वार्ता.) – धानोरा येथे  ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र उद्ध्वस्त करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या कार्यक्रमास जोरदार विरोध करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची अनुमती रहित करण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे केली आहे. (जी गोष्ट काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लक्षात येते, ती शासनाच्या लक्षात का येत नाही ? – संपादक) 

अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

यासारख्या ख्रिस्त्यांच्या महोत्सवातून अंधश्रद्धेला नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, एवढेच नव्हे, तर तिथे हिंदु धर्माचा अवमान करणारी पत्रकेही वाटली जातात. याविषयीची माहिती स्थानिक हिंदुत्वनिष्ठांना आहे. धर्मपरिवर्तनाच्या हेतूनेच हिंदु देवता, तसेच परंपरा यांविषयी अपप्रचारही केला जातो. अशा प्रयोगातून नवापूर, अक्कलकुवा आणि नंदुरबार या तालुक्यांत आदिवासींसह सर्व स्तरांतील हिंदु बांधवांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेले आहे. त्यामुळे या कार्यक्रमांच्या विरोधात हिंदूंच्या भावना तीव्र आहेत. याची शासकीय यंत्रणेने गंभीर नोंद घ्यावी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेऊन या महोत्सवाला देण्यात आलेली अनुमती रहित करण्यात यावी, अशा मागण्या समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले. या वेळी १० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सहभागी संघटना

व्यायामशाळा आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राणी लक्ष्मीबाई मित्र मंडळ, दंडपणेश्‍वर मित्र मंडळ, स्वदेशी जागरण मंच, दुर्गा दौड उत्सव समिती, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अजय कासार, बजरंग दलाचे श्री. विवेक चौधरी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नरेंद्र तांबोळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. भिका गिरनार, स्वदेशी जागरण मंचचे श्री. कपिल चौधरी, राणा राजपूत सेवा समितीचे श्री. चेतन राजपूत, श्री. जितेंंद्र राजपूत, सामाजिक कार्यकर्त्या सौ. योगिता सोनार, सौ. सुनीता मालचे, सर्वश्री आकाश गावित, मयूर कासार, देवेंद्र कासार, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) रजनी नटावदकर आणि कु. भावना कदम


Multi Language |Offline reading | PDF