निष्पक्षपाती अन्वेषण करून निर्दोष पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची त्वरित सुटका करा !

ठाणे ते मुलुंडपर्यंत काढलेल्या भव्य पदयात्रेत भाविक आणि धर्मप्रेमी यांची मागणी !

मौन पदयात्रेत सहभागी झालेले भाविक आणि हिंदु धर्मप्रेमी

मुंबई, १ एप्रिल (वार्ता.) – बलात्काराच्या कथित आरोपाखाली मागील ६ वर्षांपासून कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधात आरोप सिद्ध झालेले नाहीत. असे असतांना त्यांना जामीनही संमत करण्यात आलेला नाही. या प्रकरणाचे निष्पक्षपाती अन्वेषण करून निर्दोष पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मौन पदयात्रेत केली. ३१ मार्च या दिवशी ठाणे येथील शिवाजी महाराज तलाव ते भांडुप येथील प्रमोद महाजन क्रीडांगणापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत हिंदूराष्ट्र सेना, युवा जागृती संघ, राष्ट्र प्रथम आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक, तसेच पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

क्षणचित्रे

१. पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी हातात भगवे ध्वज, राष्ट्रध्वज आणि पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे निर्दोषत्व दर्शवणारी सूत्रे लिहिलेले फलक धरले होते.

२. पदयात्रा शिस्तबद्धरित्या काढण्यात आली. त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा झाला नाही.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील आरोप हे राजकीय षड्यंत्र ! – प्रमोद वर्मा, प्रसिद्धीमाध्यम प्रभारी, आसारामजी बापू संप्रदाय

या प्रकरणात वैद्यकीय पडताळणी होऊन बलात्काराची पुष्टी झालेली नाही. पीडित युवतीच्या तक्रारीमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आलेला नाही. जोधपूरचे पोलीस अधिकारी अजयपाल लांबा यांनी ‘पीडित युवतीच्या मैत्रीणीने मुलाखतीमध्ये ‘तिला जे सांगितले त्याप्रमाणे ती बोलली आहे’, असे म्हटले आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील आरोप हे राजकीय षड्यंत्र आहे, हे सिद्ध झाले आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्र आणि समाज यांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांनी सहस्रो बालसंस्कार केंद्र, युवा सेवा संघ, महिला उत्थान मंडळे, व्यसनमुक्ती अभियान, युवाधन सुरक्षा अभियान, स्वास्थ्य चिकित्सा सेवा, आदिवासी आणि मागास लोकांचा विकास, गोसंवर्धन अन् गोरक्षा आदी कार्य नि:शुल्कपणे चालवून समाजाला योग्य दिशा दिली आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी.


Multi Language |Offline reading | PDF