आता आमची मने जुळली आहेत ! – उद्धव ठाकरे

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या गांधीनगर (गुजरात) येथील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

गांधीनगर (गुजरात) – मी येथे कसा काय आलो याचे अनेकांना आश्‍चर्य वाटत आहे. अनेकांच्या पोटात दुखत आहे. आम्ही एकमेकांशी भांडत असल्याचा अनेकांना आनंद होत होता. आमच्यात मतभेद नक्की होते; पण भेट झाल्यानंतर सगळे मिटले. सर्व वाद आम्ही संपवले आहेत. आता आमची मने जुळली आहेत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या येथे उमेदवारी अर्ज भरतांनाच्या आधी घेण्यात आलेल्या सभेत केले. त्यांनी शहा यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१. आमची विचारधारा एकच आहे हिंदुत्व. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्व आपला श्‍वास आहे आणि तो थांबला तर जगायचे कसे ? असे म्हणतात की, हात मिळाले; पण मने मिळाली नाहीत, तर काय लाभ ?

२. विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी एकही चेहरा नाही. विरोधकांनी एक सभा घ्यावी आणि एका नेत्याच्या नावे घोषणा करून दाखवावे. आधीच पाय खेचण्याचे कार्यक्रम चालू आहेत, मग पुढची वाटचाल कशी चालू रहाणार ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now