बरेली (उत्तरप्रदेश) येथे मिशनरी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव

  • भाजपच्या राज्यात अशा घटना होणे अपेक्षित नाही !
  • ख्रिस्ती संस्थांकडून चालवलेल्या शाळा म्हणजे ‘धर्मांतराचा अड्डा’ आहे, हे याआधी अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे या शाळेतही असे काही होत असल्याचे पुढे आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • ‘अशा शाळांमध्ये स्वतःच्या पाल्याला शिकायला पाठवणे, म्हणजे आत्मघात’, हे हिंदु पाल्यांना समजेल, तो सुदिन !
  • निधर्मीवादी प्रसारमाध्यमे अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि अन्य धर्मियांनी हिंदु धर्मात केलेल्या घरवापसीच्या घटनांच्या विरोधात वृत्त प्रसारित करतात !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालवलेल्या ‘बिशप कॉनराड’ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. ‘विद्यार्थ्यांनी धर्मांतरास नकार दिल्याने त्यांना परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले’, असा आरोप या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. तसेच या संदर्भात पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न झाला. शाळा प्रशासनाने पालकांचा आरोप फेटाळून लावून ३ सदस्यीय समिती नेमून विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका पुन्हा पडताळण्यास सिद्ध असल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांनी ते स्वीकारून तक्रार करण्याचे टाळले. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे पवन अरोरा, मुसलमानांचे प्रतिनिधी खलील कादरी आदी पालकांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात पोचले होते. याच वेळी या शाळेत पूर्वी शिक्षक असणारे सार्थक सहगल यांनीही ‘माझ्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता’, असा आरोप केला.

१. सार्थक सहगल यांनी सांगितले, ‘‘मलाही धर्मांतर करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी मला ७ लाख रुपयांचे आमीष दाखवण्यात आले होते. माझ्यावर विद्यार्थिनींची छेड काढल्याचा खोटा गुन्हा नोंदवण्याची धमकीही देण्यात आली होती. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी पोलिसांनाही हे पुरावे दिले आहेत.’

२. शाळेचे व्यवस्थापक फादर हेराल्ड डी कुन्हा यांनी सहगल यांनी केलेले आरोप   फेटाळले. फादर म्हणाले की, सहगल वर्गामध्ये विद्यार्थिनींशी अश्‍लील बोलत होते. याविषयी विद्यार्थिनींनी तक्रार केली होती. याच काळात सहगल यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना परत नोकरीवर रुजू करून घेण्यात आले नाही. सहगल यांनीच शाळेच्या विरोधात पालकांना धर्मांतराविषयी खोटे सांगून भडकावले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now