(म्हणे) ‘दाभोलकर आणि पानसरे यांना असुर समजून ठार करण्यात आले !’ 

माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांचा मनमानी आरोप

दाभोलकर आणि पानसरे यांना मारण्याचा उद्देश मारेकर्‍यांनी खोपडे यांच्या कानात येऊन सांगितला का ?

पुणे – धर्मशास्त्रानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सनातन संघटना यांनी हिंदूंचे सुर अन् असुर असे दोन प्रकार केले आहेत. (सुर आणि असुर हे प्रकार या संघटनांनी  केलेले नाहीत, तर हिंदु धर्मातच सांगितले आहेत. अनेक हिंदु धर्मग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. सुरेश खोपडे यांना हे माहीत नसावे, हे आश्‍चर्यकारक आहे ! – संपादक) शास्त्रानुसार आचरण करत नाहीत ते असुर असून ते भगवंताचा द्वेष करतात. अंधश्रद्धेविरोधी झगडणारे डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना असुर समजून ठार करण्यात आले, असा आरोप माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला. ‘दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना पकडणे पोलिसांना अशक्य नाही; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपींचा शोध घ्यायचा नाही’, असेही म्हणाले.

माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे

खोपडे पुढे म्हणाले, ‘‘११ ऑक्टोबर २०१६ ला नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यामध्ये व्यासपिठावर लिहिलेल्या फलकावर ‘हिंदुत्व न मानणार्‍यांचा संपूर्ण विनाश करायचा आहे’, असा अर्थ असलेली वाक्ये लिहिली होती. हिंदु संघटनांचे आरोपी पकडले, तर मतपेढीवर परिणाम होईल; म्हणून सरकार ढिले राहिले. (पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणी चौकशीच्या नावाखाली विविध अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या निरपराध साधकांचा मानसिक छळ केला, तसेच कोणतेही पुरावे नसतांना त्यांना संशयित म्हणून कोठडीत डांबून ठेवण्यात आले आहे, याविषयी मात्र खोपडे चिडीचूप आहेत. अशा पूर्वग्रहदूषित पोलीस अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यकाळात कसे अन्वेषण केले असेल, याची कल्पना येते ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now