बलात्काराच्या प्रकरणी धर्मांधाला ५ दिवस पोलीस कोठडी

लव्ह जिहादच्या विळख्यात हिंदु मुलगी !

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), ३१ मार्च – अल्पवयीन हिंदु मुलीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मुराद मोहब्बत हाशमी (वय १९ वर्षे, रहाणार बलरामपूर, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पीडित मुलीने मुरादच्या विरोधात १० दिवसांपूर्वी तक्रार प्रविष्ट केली होती. तेव्हापासून तो पसार होता. २९ मार्चला संशयित मुराद हा ईश्‍वरपुरातील काम संपवून ताकारी येथून रेल्वेने मूळ गावी जाणार असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत ताकारी परिसरात त्याला अटक केली. (सुविधा मिळवण्यात अल्पसंख्य म्हणून ओरड करणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ? – संपादक)

मुरादने पीडित मुलीशी मैत्री करून तिला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर बळजोरी केली. याची माहिती कोणाला दिल्यास अपकीर्ती करण्याची धमकी तो देत असे. दोन आठवड्यांपूर्वी युवतीला ताप आल्याने तिला रुग्णालयात भरती केल्यावर आधुनिक वैद्यांनी युवती गर्भवती असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी मुरादचा शोध घेण्यास प्रारंभ केला. मुरादचे पूर्ण नाव, पत्ता, तसेच अन्य कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी तो ज्या परिसरात रहात होता, तेथील परप्रांतीय कामगारांना विश्‍वासात घेऊन माहिती मिळवली आणि मुरादला अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF