अमित शहा यांच्या संपत्तीत ७ वर्षांत ३ पट वाढ

  • सर्वच राजकारण्यांच्या संपत्तीत अल्प कालावधीत होणारी वाढ संशयच निर्माण करते !
  • अमित शहा यांनी त्यांना काही कोटी रुपये वारसाहक्काने मिळाल्याचे नमूद केले आहे. तरीही पारदर्शकता म्हणून, तसेच लोकांच्या मनात संशयाची जागा राहू नये म्हणून अमित शहा यांनी याविषयी सखोल स्पष्टीकरण देणे जनतेला अपेक्षित आहे !

गांधीनगर (गुजरात) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या ७ वर्षांत तीनपट वाढली आहे. शहा यांनी येथील लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरल्यावर त्यातून ही माहिती समोर आली आहे. राज्यसभा सदस्य म्हणून मिळणारे मानधन, घरभाडे आणि शेती ही त्यांच्या मिळकतीची साधने असल्याचेही त्यांनी अर्जासमवेत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. अमित शहा आणि त्यांची पत्नी यांची एकूण चल-अचल संपत्ती ३८ कोटी ८१ लाख रुपये आहे. त्यात त्यांना वारसाहक्काने मिळालेल्या २३ कोटी ४५ लाख रुपयांच्या संपत्तीचाही समावेश आहे. वर्ष २०१२ मध्ये त्यांची संपत्ती ११ कोटी ७९ लाख रुपये होती. तसेच त्यांच्या विरोधात ४ गुन्हे प्रविष्ट असून त्यांपैकी २ गुन्हे बिहारमध्ये आणि २ बंगालमध्ये प्रविष्ट करण्यात आले आहेत, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now