विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय कसे करावेत ?

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा थोडक्यात परिचय !

भावी भीषण आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी विविध उपाय सांगणारे ग्रंथ आधीच प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

(पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण संकटकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ !)

ग्रंथाचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

ग्रंथाचे मनोगत

‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय’ या ग्रंथात खोक्यांच्या उपायपद्धतीचे महत्त्व आणि या पद्धतीविषयीचे मूलभूत विवेचन केले आहे. ग्रंथाच्या या दुसर्‍या खंडात खोक्यांचे प्रत्यक्ष उपाय करण्याच्या विविध पद्धती सांगितल्या आहेत. यात खोके शरिरापासून साधारण ३० सें.मी. (१ फूट) अंतरावर ठेवून उपाय करणे, खोके हातांत धरून उपाय करणे, खोक्यांचे शिरस्त्राण (हेल्मेट) घालणे यांसारखे खोक्यांचे उपाय करण्याच्या व्यतिरिक्त दैनंदिन कामकाज, अभ्यास इत्यादी करतांनाही खोक्यांचे उपाय सहजपणे कसे करता येतात, हे सांगितले आहे. आजकाल अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. शांत झोप लागण्यासाठी साहाय्यक ठरणारे खोक्यांचे उपाय कसे करावेत, याचेही विवेचन या भागात केले आहे.

मनुष्य हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. ग्रंथात शरिरातील अवयवसंस्थांनुसार विविध विकार आणि त्या विकारांशी संबंधित महाभूते सांगितली आहेत. खोका हा आकाशतत्त्वाशी संबंधित असला, तरी तो विशिष्ट मापाचा बनवल्यास त्याद्वारे विशिष्ट महाभूताच्या स्तरावर खोक्याचे उपाय अधिक प्रमाणात होऊ शकतात. त्या त्या महाभूताच्या स्तरावरील उपायांमुळे त्या त्या महाभूताच्या स्तरावरील विकार लवकर अल्प होण्यास साहाय्य होते. यासाठी ग्रंथात विशिष्ट महाभूताशी संबंधित विकारासाठी विशिष्ट मापाचा खोका वापरण्यास सांगितले आहे. विकारांनुसार विशिष्ट मापाचे खोके बनवणे शक्य नसेल, तर सर्व महाभूते सारख्याच प्रमाणात सामावून घेणारा एकाच मापाचा खोका वापरावा, हेही सांगितले आहे.

खोक्यांचे उपाय करतांना नामजप आणि मुद्रा किंवा न्यासही केला, तर उपायांची फलनिष्पत्ती वाढते. यासाठी ग्रंथात ‘पंचमहाभूते आणि त्यांच्याशी संबंधित प्रमुख देवतांचे नामजप’ अन् ‘पंचमहाभूते आणि त्यांच्याशी संबंधित मुद्रा अन् न्यास’ सांगितले आहेत.

काही वेळा रुग्णाला खोक्यांचे प्रत्यक्ष उपाय करणे शक्य नसते. अशा वेळी खोक्यांचे अप्रत्यक्ष उपाय (उदा. रुग्णाने स्वतःचे नाव लिहिलेला कागद किंवा स्वतःचे छायाचित्र खोक्यात ठेवणे) उपयुक्त ठरतात. असे उपायही ग्रंथाच्या या भागात सांगितले आहेत. वास्तूशुद्धीसाठी वास्तूतील रचना पालटणे, काही बांधकाम पाडणे, ‘फेंगशुई’सारख्या विदेशी पद्धतींचा अवलंब करणे, यांसारख्या उपायांपेक्षा खोक्यांच्या साहाय्याने सोप्या रितीने वास्तूशुद्धी कशी करावी, हेही सांगितले आहे. ‘खोक्यांचे उपाय करून अधिकाधिक रुग्ण लवकरात लवकर विकारमुक्त होवोत’, ही श्री गुरुचरणी आणि विश्‍वपालक श्री नारायणाच्या चरणी प्रार्थना !’- संकलक

सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाईन’ खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !

विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !

स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७


Multi Language |Offline reading | PDF