काँग्रेसने मतांसाठी जाणीवपूर्वक ‘हिंदु आतंकवाद’चा बागुलबुवा उभा केला ! – अरुण जेटली यांचा काँग्रेसवर प्रहार

हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी काँग्रेसी नेत्यांवर भाजपने गेल्या ५ वर्षांत कारवाई का केली नाही ? निरपराध हिंदूंना कारागृहात टाकणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई का केली नाही?, हे जेटली यांनी सांगायला हवे !

नवी देहली – काँग्रेसने केवळ मतांसाठी जाणीवपूर्वक ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण करून त्याचा वापर केला. मुळात ‘हिंदु आतंकवाद’ कधीच अस्तित्वाच नव्हता, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. असीमानंद समझौता एक्सप्रेस प्रकरणी निर्दोष मुक्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

जेटली पुढे म्हणाले की,

काँग्रेसने हिंदु आतंकवाद नावाचा कट रचला होता. तथ्यांकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. पुरावे कधी न्यायालयासमोर आलेच नाहीत. या स्फोटात जे मेले ते सामान्य लोक होते. या सगळ्याचे दायित्व काँग्रेस आणि तिच्या आघाडी सरकारलाच घ्यावे लागेल.


Multi Language |Offline reading | PDF