तुम्ही मुख्यमंत्री आहात कि एका पक्षाचे नेते ? – न्यायालयाकडून मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी

कॉ. पानसरे हत्या प्रकरण

मुंबई – तुमच्याकडे गृहखाते आहे. त्याशिवाय अनेक महत्त्वाची खाती तुम्ही बाळगता. मग तशी कार्यक्षमताही दाखवा. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात कि एका पक्षाचे नेते ?, अशी कानउघाडणी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांची केली आहे. कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने ही कानउघाडणी केली.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने चालू असल्याने न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली. कॉ. पानसरे हत्या प्रकरणात महाराष्ट्र एस्.आय.टी. अजूनही खर्‍या सूत्रधारांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस यांची न्यायालयाने कानउघाडणी केली. ‘दाभोलकर-पानसरे प्रकरणात मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी, सचिव आदींनी विशेष लक्ष द्यायला हवे. कनिष्ठ अधिकार्‍यांना अन्वेषणात जेव्हा अपयश येते, तेव्हा वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यात लक्ष घालायला हवे. पसार आरोपींवरील बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याने लोक पसार आरोपीला पकडून देतील हा भ्रम आहे. आरोपींना पकडण्याचे दायित्व पोलिसांचे असते’, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF