गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारे वासनांध धर्मांध !

मुंबई – गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी सलीम या धर्मांधासह अन्य एका अल्पवयीन आरोपीला अटक केले आहे. ही घटना कांदिवली (पूर्व) परिसरात घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या मैत्रिणीलाही आरोपी करण्यात आले असून कांदिवली येथील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २५ मार्च या दिवशी रात्री ८ वाजता पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीने  भेटायला बोलावून तिला निर्जन ठिकाणी फिरायला नेले. या ठिकाणी असलेल्या आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलीस पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF