अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांची गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप यांच्या विरोधात राज्य मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे तक्रार

स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचा अनधिकृतपणे राजकीय लाभ उठवल्याने आचारसंहिता भंग झाल्याचा तक्रारीत आरोप

पणजी – स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचा भाजप आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अनधिकृतपणे राजकीय लाभ उठवत आहेत आणि यामुळे आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी गोवा राज्य मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे केली आहे. अधिवक्ता रॉड्रिग्स यांनी तक्रारीत म्हटले आहे की, स्व. मनोहर पर्रीकर यांच्या अस्थीकलश कार्यक्रमामुळे गोव्यात भाजपला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विजय मिळणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतेच केले आहे. सध्या राज्यभर स्व. पर्रीकर यांच्या निधनाला अनुसरून चाललेल्या शोकसभा या वास्तविक भाजपच्या प्रचारसभा आहेत.

स्व. पर्रीकर यांच्या अस्थी राज्यभर फिरवून भाजप अनधिकृतपणे पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. वरिष्ठ नेते पर्रीकर कुटुंबियाच्या सांत्वनपर भेटी घेत आहेत आणि भाजप या भेटीतून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now