मशिदी, दर्गे आणि मदरसे यांवर १ सहस्र ७६६ अनधिकृत भोंगे !

  • महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांची समस्या गंभीर !

  • नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचलग यांच्याकडून न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट

  • नागरिकांच्या तक्रारींकडे पोलीस आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष

  • न्यायालयाच्या निर्णयाचाही पोलिसांकडून अवमान

  • मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडणारे सरकार मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
  • भोंग्यांवरील कारवाईविषयी न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान करणारे पोलीस आणि प्रशासन सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीची कधी नोंद घेईल का ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांवर न्यायालयाने कठोर कारवाई करायला हवी !
  • हिंदूंना वारंवार लक्ष्य करणार्‍या हिंदुद्वेषी पुरो(अधो)गाम्यांना मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविषयी न्यायालयाचा होणारा अवमान दिसत नाही. यातून पुरो(अधो)गाम्यांचे ढोंगी घटनाप्रेम दिसून येते !
  • हिंदूंच्या उत्सवांत ध्वनीक्षेपकांवर कारवाई करणे आणि मशिदींवरील भोंग्यांवर कारवाईच्या वेळी शेपूट घालणे, हीच पोलिसांची मर्दुमकी आहे का ?

राज्यात २ सहस्र ९४० प्रार्थनास्थळांवर अनधिकृत भोंगे !

एकूण २ सहस्र ९४० प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांपैकी मशिदी, मदरसे आणि दर्गे यांवर सर्वाधिक १ सहस्र ७६६ अनधिकृत भोंगे आहेत. त्यापाठोपाठ मंदिरांवर १ सहस्र २९, चर्चवर ८४, बौद्ध विहारांवर ३९, तर गुरुद्वारावर २२ अनधिकृत भोंगे आहेत.

मुंबई, २९ मार्च (वार्ता.) – राज्यात २ सहस्र ९४० प्रार्थनास्थळांवर अनधिकृत भोंगे असून त्यात मशिदी, मदरसे आणि दर्गे यांवर सर्वाधिक १ सहस्र ७६६ अनधिकृत भोंगे आहेत, अशी माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली. नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष पाचलग यांनी माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांविषयी माहिती मिळवली.

पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे न्यायालयात याचिका

नवी मुंबईमधील ४९ मशिदींपैकी ४५ मशिदींवरील भोंगे अनधिकृत आहेत. याविषयी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे श्री. पाचलग यांनी पोलिसांना २ वेळा स्मरणपत्रेही दिली. वास्तविक मुंबई उच्च न्यायालयाने १६ ऑगस्ट २०१६ या दिवशी ‘प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी’, असा स्पष्ट आदेश दिला आहे. तरीही आतापर्यंत पोलीस आणि प्रशासन यांनी कायदा अन् सुव्यवस्था यांचे कारण पुढे करत न्यायालयाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. (न्यायालयाच्या आदेशानंतरही अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई न करणारे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? याशिवाय ‘पोलीस मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करायला घाबरतात’, हेही यावरून सिद्ध येते. असे घाबरट पोलीस उद्या धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले, तर त्यांना कधीतरी रोखू शकतील का ? – संपादक) नवी मुंबई पोलिसांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात काहीच कारवाई न केल्यामुळे शेवटी श्री. पाचलग यांनी काही मासांपूर्वी न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केली. या याचिकेवर ७ जून २०१९ या दिवशी सुनावणी होणार आहे.

पोलीस आणि प्रशासन यांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे वारंवार उल्लंघन

श्री. संतोष पाचलग यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबर्ई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांत पोलिसांच्या अनुमतीविना किती मदरशांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत आणि त्यावर केलेली कारवाई, यांविषयीचा अहवाल २ मासांत सादर करण्याचा आदेश दिला होता.

दोन्ही शहरांतील पोलीस आयुक्तांकडून हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला नाही. ३० जुलै २०१४ या दिवशी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी अंतरिम आदेश देऊनही पोलिसांकडून मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात आली नाही. तसेच श्री. पाचलग यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्रही संदिग्ध होते. यामुळे न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणी करत त्यांना नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून न्यायालयाचा वारंवार अवमान होत आहे. श्री. पाचलग यांनी पुढे पुरवणी याचिका करून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या याचिकेवर न्यायालयाने कारवाई करण्याचा आदेश देऊनही पोलीस आणि प्रशासन अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत, असे दिसून येत आहे.

हिंदूंच्या उत्सवांत ध्वनीवर्धकांवर कारवाई; मात्र मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई नाही !

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी उत्सवांच्या कालावधीत कार्यकर्त्यांकडून जर ध्वनीवर्धकाच्या मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत, तर पोलीस तत्परतेने कारवाई करतात. याउलट मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर मात्र कारवाई करण्यास पोलीस घाबरत असल्याचे दिसून येते. वर्ष २०१४ मध्ये मुंबई येथील बजरंग दलाचे श्री. सागर देवरे यांनी कुर्ला येथील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात, तर २४ मार्च २०१९ या दिवशी कुर्ला येथील स्थानिक ९ जणांनी कुर्ला पोलीस ठाण्यात कुर्ला येथील मिर्झावाडीतील मशिदीवरील अनधिकृत भोंग्याच्या विरोधात तक्रार केली; मात्र अद्याप पोलिसांनी त्यावर काहीही कारवाई केलेली नाही. (तक्रारीनंतरही पोलीस कारवाई करत नसतील, तसेच न्यायालयाच्याही आदेशाला जुमानत नसतील, तर सरकारने अशा पोलिसांना घरी बसवावे. अशांना जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचे ?  – संपादक)

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई न करण्याची पोलिसांची कृती सामाजिक विषमता निर्माण करणारी ! – संतोष पाचलग, याचिकाकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते

भारताचा एक जागरूक नागरिक म्हणून मी प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयाने प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याचा आदेश देऊनही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. बहुतांश ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होत आहे. ‘डेसीबल’ची मर्यादा पाळली जात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. हिंदूंच्या मंदिरांवर क्वचितच भोंगे असतात आणि असले, तरी ते लावतांना कायद्याचे पालन केले जाते. मंदिरांवरील भोंगे लावतांना जर कायद्याचे उल्लंघन झाले, तर पोलीस त्वरित कारवाई करतात; मात्र मशिदींवरील भोंगे लावतांना कायद्याचे उल्लंघन होऊनही पोलीस कारवाई करत नाहीत. मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करायला पोलिसांना भीती वाटते. पोलिसांची ही कृती सामाजिक विषमता निर्माण करणारी आहे. कायदा सर्वांना समान असावा. समान नागरी कायद्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे. त्यामुळे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.


Multi Language |Offline reading | PDF