न्यायव्यवस्थाही भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरलेली आहे ! – मद्रास उच्च न्यायालय

  • लोकशाहीची झालेली ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
  • न्यायालयाने केवळ असे सांगून गप्प न बसता न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणे जनतेला अपेक्षित आहे ! असे केले, तरच जनतेचा न्यायालयावरील विश्‍वास अबाधित राहील !
  • स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षांनंतरही सर्व क्षेत्रांतील भ्रष्टाचार निपटू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते यास उत्तरदायी आहेत. हे भारतासाठी अत्यंत लज्जास्पद !

चेन्नई – आज शासनव्यवस्था पूर्णपणे भ्रष्टाचाराने पोखरली आहे. लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही गरिबांना लाच द्यावी लागते. शिष्यवृत्तीचे पैसे मिळवण्यासाठीही भ्रष्टाचार करावा लागतो. देशातील एकही जागा अशी उरलेली नाही जिथे भ्रष्टाचार नाही. मृतदेहाचे दफन करण्यासाठीही लाच द्यावी लागते आणि न्याय मिळवण्यासाठीही भ्रष्टाचार करावा लागतो. न्यायव्यवस्थाही भ्रष्टाचाराने आतून-बाहेरून पोखरलेली आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलायला हवीत, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाने केले. ‘प्रशासनातील भ्रष्टाचार संपणे आवश्यक आहे’, असेही न्यायालयाने म्हटले.

‘व्हिलेज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर’ (व्हिएओ) असणारे पी. सर्वानन् यांना काही दिवसांपूर्वी लाच घेतल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. त्या विरोधात त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि वरील विधाने केली.

आतंकवाद आणि भ्रष्टाचार दोन्हीही राष्ट्रविरोधी !

न्यायालयाने पुढे म्हटले की, जे कोणी भ्रष्टाचार करत आहेत, ते सर्व राष्ट्रविरोधी आहेत. जर आतंकवादाला आपण राष्ट्रविरोधी मानत असू, तर भ्रष्टाचाराला का नाही? हे दोन्ही देशाच्या व्यवस्थेला सारखेच घातक आहेत. जे जे भ्रष्टाचार करतात त्या सर्वांना ‘देशविरोधी’ घोषित करायला हवे. तसेच भ्रष्टाचार थांबवण्यासाठी उपाययोजना राबवल्या पाहिजेत.

निवडणुकीच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार होतो !

देशात सर्वाधिक भ्रष्टाचार निवडणुकांच्या काळात होतो. निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून येतात. जर लोकप्रतिनिधींची निवडच भ्रष्ट पद्धतीने होत असेल, तर हे देशाच्या लोकशाही मूल्यांना आणि तत्त्वांना धक्का पोचवणारे आहे, असेही न्यायालयाने म्हटले. (अशा लोकशाहीऐवजी आता हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंनी कटीबद्ध झाले पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF