दादर आणि बोरीवली येथे श्रीमद्भगवद्गीतेचे संथावर्ग चालू होणार !

मुंबई – दादर (पश्‍चिम) आणि बोरीवली (पश्‍चिम) येथे आबालवृद्धांसाठी श्रीमद्भगवद्गीतेचे संथावर्ग चालू होणार असून यात संपूर्ण गीता (१८ अध्याय, ७०० श्‍लोक) संथा पद्धतीने विनामूल्य शिकवण्यात येणार आहे. ‘या वर्गांचा लाभ घ्यावा’, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

वर्गांचे स्थळ, वेळ आणि संपर्क क्रमांक

१. स्थळ : ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (पश्‍चिम), मुंबई ४०००२८

वार : शनिवार आणि रविवार

वेळ : ६ एप्रिल २०१९ पासून सायंकाळी ४ ते ५.३०

संपर्क : श्री. श्रीकृष्ण जोशी (०२२-२४३० ०८१७/९६१९८२८१५७)

२. स्थळ : ब्राह्मण सेवा संघ, जयराजनगर, बोरीवली (पश्‍चिम)

वार : रविवार

वेळ : ७ एप्रिल २०१९ पासून सकाळी १० ते ११.३०

संपर्क : श्री. श्रीकृष्ण जोशी आणि सौ. मानसी सोमण (९८२०३५४७७४)


Multi Language |Offline reading | PDF