‘रामजन्मभूमी’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी देहली – ‘रामजन्मभूमी’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच यावर पुढील सुनावणी २ आठवड्यांनी घेण्यात येईल, असेही सांगितले. या चित्रपटामुळे रामजन्मभूमीच्या वादावरील मध्यस्थांकडून चाललेल्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो, असे सांगत न्यायालयात याचिका करण्यात आली होती. न्यायालयाने म्हटले की, चित्रपट आणि मध्यस्थांची प्रक्रिया यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now