डेहराडून येथील मिशनरी शाळेत विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याची हत्या करून त्याला पुरले !

  • शाळा प्रशासनाकडून हत्या झाल्याचे लपवण्याचा प्रयत्न

  • २ विद्यार्थी, २ शिक्षक आणि १ कर्मचारी यांना अटक

ख्रिस्त्यांच्या शाळांमध्ये मुलांचे वैचारिक धर्मांतर होत असल्याचे उघड आहे. आता तर तेथील मुले खुनीही निपजतात आणि त्याही पलीकडे जाऊन तेथील शिक्षक अन् इतर कर्मचारी त्यांना पाठीशी घालतात, हेच या घटनेतून स्पष्ट होते. अशा शाळांना टाळे ठोकण्याचे धारिष्ट्य भाजप सरकार दाखवणार का ?

डेहराडून (उत्तराखंड) – येथील एका मिशनरी बोर्डिंग शाळेत ७ वीत शिकणार्‍या वासु यादव या १२ वर्षांच्या विद्यार्थ्याची अन्य विद्यार्थ्यांनी हत्या केली. त्यानंतर कर्मचार्‍यांच्या साहाय्याने त्याला पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी १ कर्मचारी, २ शिक्षक आणि २ विद्यार्थी यांना अटक करण्यात आली आहे.

१. वासु याने काही दिवसांपूर्वी शाळेबाहेरील दुकानातून बिस्किटे चोरली होती. या दुकानाच्या मालकाने शाळेकडे तक्रार केली होती. त्यामुळे शाळेने सर्व मुलांना बाहेर जाण्यापासून रोखले होते.

२. याचा राग काही मुलांच्या मनात होता. त्याच रागातून बारावीत शिकणार्‍या २ विद्यार्थ्यांनी वासूला बॅटने मारहाण केली आणि त्याला काहीतरी विषारी पाजले. त्यानंतर तो मुलगा उलट्या करू लागला.

३. शाळेचे वॉर्डन अजय कुमार याला हा प्रकार समजल्यानंतर त्याने मुलाला रुग्णालयात नेले; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर वॉर्डनने शिक्षक अशोक सोलोमन आणि प्रवीण मेस्सी यांच्या साहाय्याने त्या मुलाचा मृतदेह शाळेत पुरला.

४. यानंतर त्यांनी मुलाच्या पालकांना मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळवले आणि हानीभरपाई देणार असल्याचे सांगितले; मात्र मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.


Multi Language |Offline reading | PDF