‘भ्रमणध्वनी’मध्ये व्यस्त असणार्‍या सुरक्षारक्षकांवर महापालिकेकडून वेतनकपातीची कारवाई

मुंबई – महापालिकेतील सुरक्षारक्षक भ्रमणध्वनीवर व्यस्त असल्याचे दिसल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. काही सुरक्षारक्षकांना दोन ते पाच सहस्र रुपये दंडही आकारण्यात आला आहे. कामगारांच्या विरोधात केलेली ही कारवाई एकतर्फी आहे. सुरक्षारक्षकांना शिस्त लागली पाहिजे; पण कामगारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी प्रशासनाने दिली पाहिजे, अशी माहिती मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश देवदास यांनी दिली. (अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना पाठीशी घालणार्‍या कामगार संघटना जनहित काय साधणार ! – संपादक)

प्रशासनाने मुख्यालयातील तसेच प्रभाग (वॉर्ड) कार्यालयातील सुरक्षारक्षकांना भ्रमणध्वनीबंदी केली आहे. कामावर असतांना भ्रमणध्वनी बघणे, हेडफोन लावलेला असणे अशा कारणांवरून प्रशासनाने आता सुरक्षारक्षकांना मेमो देणे चालू केले आहे.

मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेने या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याची चेतावणी दिली आहे. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now