पोरबंदर येथील समुद्रात नौकेतून ५०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

यापूर्वी अशा प्रकारे किती अंमलीपदार्थ भारतात आले असेल, याची कल्पना करता येत नाही !

गांधीनगर (गुजरात) – भारतीय तटरक्षक दल आणि आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत समुद्रमार्गाने नौकेमधून आणले जाणारे १०० किलो हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनचे आंतरराष्ट्रीय बाजारात ५०० कोटी इतके मूल्य सांगण्यात येत आहे. या नौकेवरील ९ इराणी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. (अशा आरोपींना आता पोसण्यापेक्षा त्यांच्यावर जलदगतीने खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक) या इराणी नागरिकांनी पुरावा नष्ट करण्यासाठी नौकेला आगही लावली. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर येथून ही नौका निघाली होती. हमिद मलिक या पाकिस्तानी नागरिकाने यात हे हेरॉईन ठेवले होते. पोरबंदरजवळील सागरी सीमेमध्ये ही कारवाई करण्यात आली. (पाकला नष्ट केल्यावर सर्वप्रकारच्या गुन्हेगारी कारवाया कायमच्या रोखल्या जातील ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now