धुळे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने साडे दहा लाख रुपयांचे गोमांस पकडले

१६ गोवंशांची सुटका एका धर्मांधाला अटक, २ धर्मांध पसार

गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही असे प्रकार घडणे संतापजनकच ! कायद्याची कठोर कार्यवाही पोलीस कधी करणार आहेत ?

धुळे – शहरातील माधवपूर भागात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने २६ मार्चला पहाटे धाड टाकून साडे दहा लाख रुपयांचे गोमांस पकडण्यात आले आणि १६ गोवंशांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी फैजल खान फारुख खान याला पोलिसांनी कह्यात घेतले, तर नियाज अन्सारी आणि सलमान खान हे दोघे पसार झाले आहेत. यातील सलमान खान हा मालेगाव येथील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा तीनही आरोपी एका वाहनात १६ गोवंशांना कोंबत होते. त्यांचे पाय बांधण्यात आले होते. घटनास्थळी १० लाख ५१ सहस्र ८२२ रुपये किमतीचे गोमांस, तसेच गुरे कापण्यासाठीची हत्यारे आढळून आली. आरोपींविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन २०१५ चे कलम ५ अ (१), (२), ५ (ब), ५ (क), ९ (अ), (ब) सह पशुक्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ सह कलम ११९, ३३५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now