कट्टरतावादी साहित्य सामाजिक माध्यमांतून न काढल्यास कारागृहात डांबले जाईल !

ऑस्ट्रेलियाची फेसबूक, ट्विटर आणि गूगल यांच्या अधिकार्‍यांना चेतावणी

  • जिहादी आतंकवाद सर्वाधिक काळ सोसत असलेल्या भारताने कधी अशी चेतावणी या आस्थापनांना दिली आहे का ?
  • न्यूझीलंडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर लगेच ऑस्ट्रेलियाकडून अशी कृती होते, हे भारतीय शासनकर्ते कधी शिकतील का ?

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – सामाजिक माध्यमांतून कट्टरतावादी साहित्य काढण्यात आले नाही, तर या माध्यमांच्या अधिकार्‍यांना कारागृहात टाकण्यात येईल, अशी चेतावणी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे.

स्कॉट मॉरिसन यांनी फेसबूक, ट्विटर आणि गूगल यांच्या समवेत अन्य आस्थापनांच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. यात त्यांनी या अधिकार्‍यांकडे विचारणा केली की, त्यांच्या माध्यमाद्वारे आतंकवाद वाढण्याचा उपयोग होऊ नये, यासाठी तुमच्याकडे कोणती योजना आहे ? यावर फेसबूकने सांगितले की, न्यूझीलंडच्या घटनेचा व्हिडिओ आम्ही त्वरित काढला होता.


Multi Language |Offline reading | PDF