रविवार, ३१ मार्चला देशभरात सर्व सरकारी बँका खुल्या रहाणार ! – रिझर्व्ह बँकेची सूचना

मुंबई – ३१ मार्च या रविवारच्या दिवशी देशभरातील सर्व सरकारी बँका खुल्या रहाणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना तशा सूचना दिल्या आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ मार्च हा रविवारी येत असल्याने रिझर्व्ह बँकेने अशा सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार, सरकारी बँकांच्या सर्व शाखा ३० मार्च २०१९ या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुसर्‍या दिवशी ३१ मार्चला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या रहाणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF