पुण्यात श्री पुण्येश्‍वर मंदिराच्या ठिकाणी असलेल्या दर्ग्याचे अवैधरित्या मशिदीमध्ये रूपांतर करणे चालू !

  • प्रशासनाकडून कानाडोळा !

  • हिंदुत्वनिष्ठांमध्ये संताप !

  • नियम धाब्यावर बसवून चालू आहे अवैध बांधकाम !

  • धर्मांधांकडून न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली !
  • भाजपच्या राज्यातील धर्मांधांचा वाढता ‘लॅण्ड (भूमी) जिहाद’ ! यापूर्वीही हिंदुत्वनिष्ठांचा विरोध झुगारून डेक्कन येथे हाजी मक्केशा मशीद उभारण्यात आली. विशेष म्हणजे मुसलमान वस्ती नसतांनाही पालखीच्या मार्गावर ही मशीद उभारण्यात आली आहे. सारसबागेजवळील आदमबाग मशीद रस्त्याच्या मध्ये येत असतांनाही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही ! अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. धर्मांधांच्या ‘लॅण्ड जिहाद’चीच ही उदाहरणे आहेत. हिंदूंना एक न्याय आणि धर्मांधांना एक न्याय देणारी लोकशाही म्हणूनच निरर्थक ठरत आहे !

(Ruins of Punyeshwar Temple found under Shaikhsallah Durgah in Pune !)

पुणे, २७ मार्च (वार्ता.) – ज्या श्री पुण्येश्‍वर महादेव मंदिरावरून शहराला ‘पुणे’ हे नाव मिळाले, त्यावर उभारण्यात आलेल्या छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या ठिकाणी अनधिकृत बहुमजली मशीद बांधण्याचे काम चालू झाले आहे. हे बांधकाम करणार्‍या शेख सलाउद्दीन चिश्ती ट्रस्टकडे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुठल्याही अनुमत्या नाहीत. असे असतांनाही दर्ग्याचे मशिदीत रूपांतर करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांसह ग्रामस्थांनी विरोध करत ‘प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबण्याचा आदेश द्यावा’, अशी मागणी करत आंदोलन उभे केले आहे. (हिंदूंनो, धर्मांधांची विकृत मानसिकता जाणा ! वास्तविक दर्ग्याच्या खाली पुण्येश्‍वर महादेव मंदिर आहे, याची माहिती मिळाल्यानंतर मुसलमानांनी तात्काळ ती भूमी हिंदूंकडे सुपुर्द करत बंधूभाव जोपासायला हवा; पण धर्मांधांच्या रक्तातच हिंदुद्वेष भिनलेला असल्याने ती भूमी हिंदूंना सोपवणे, तर सोडाच, उलट त्या ठिकाणी अनधिकृत मशिदीचे बांधकाम चालू केले आहे आणि एरव्ही ‘सहिष्णुता धोक्यात’ असल्याचा कांगावा करणारे पुरो(अधो)गामी धर्मांधांच्या या असहिष्णुतेविषयी मात्र चिडीचूप आहेत. वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण सांगून मंदिरे भुईसपाट करणारे पोलीस-प्रशासन मशिदीच्या अनधिकृत बांधकामाविषयी माहिती मिळूनही अद्याप सुस्त का ? यावरून एक तर प्रशासन आंधळे आहे किंवा हेतूपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ! याला उत्तरदायी असणार्‍यांना कायमचे बडतर्फ करून त्यांना कारागृहात पाठवायला हवे ! याविषयी भाजप सरकार काय कारवाई करणार आहे, हे त्याने स्पष्ट केले पाहिजे ! – संपादक)

याविषयी मिळालेली माहिती अशी,

१. दर्ग्याच्या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात पुणे येथील दिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट करण्यात आला होता. वर्ष २०१२ मध्ये त्या दाव्याचा निकाल लागून न्यायालयाने बांधकाम थांबवण्यासाठी ‘स्टे ऑर्डर’ (स्थगिती) दिली.

२. बांधकाम करण्यास स्थगिती असतांनाही वर्ष २०१६ मध्ये धर्मांधांनी दर्ग्याच्या बाजूला पत्रे ठोकले आणि आतमधून पुन्हा मशिदीचे बांधकाम चालू केले.

३. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून होत असलेले हे बांधकाम म्हणजे सरळसरळ न्यायालयाचा अवमान होता. हिंदूंनी या बांधकामाच्या विरोधात पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर वर्षभर सुनावणी होऊन १३ मार्च २०१९ ला उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेली ‘स्टे ऑर्डर’ उठवली; पण त्याच जोडीला कुठलेही बांधकाम करायचे असेल, तर आवश्यक त्या सर्व अनुमत्या घेणे बंधनकारक असल्याचेही सांगितले.

४. धर्मांधांनी मात्र अग्नीशमन विभाग, पुरातत्व खाते, महापालिका यांची कोणतीही अनुमती न घेता मशिदीचे बांधकाम चालू केले आहे.

श्री पुण्येश्‍वर मंदिर आणि शेख सल्ला दर्गा

छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या ठिकाणी पुण्येश्‍वर महादेव मंदिराचे अवशेष

वर्ष १३१८ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देहलीच्या सुलतानाचे राज्य चालू झाले. पुण्यावरही या काळात सुलतानी अंमल चालू झाला. याच कालखंडात हिस्सामुद्दीन आणि अन्य चार उपदेशक इस्लामचा प्रसार करण्यासाठी पुण्यात आले. त्यांनी पुण्यामधील श्री नारायणेश्‍वर आणि श्री पुण्येश्‍वर ही प्राचीन मंदिरे नष्ट केली. तेथे आज अनुक्रमे थोरला शेख सल्ला आणि धाकटा शेख सल्ला दर्गे स्थापन झाले आहेत. यातील धाकटा शेख सल्ला दर्गा कुंभारवाड्याच्या समोर आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा तेथील नदीकाठाच्या बाजूची भिंत पडली, तेव्हा छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या ठिकाणी पुण्येश्‍वर महादेव मंदिराचे अवशेष आढळून आले. पुण्येश्‍वर महादेव मंदिरावरूनच शहराला ‘पुणे’ हे नाव पडल्याचे मानले जाते.


Multi Language |Offline reading | PDF