(म्हणे) ‘ढोंगी राष्ट्रवादाच्या आतंकवादाला झुगारा !’

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्च संस्थेशी निगडित ‘सामाजिक न्याय आणि शांतता मंडळा’चे ख्रिस्ती मतदारांना आवाहन

पणजी, २७ मार्च (वार्ता.) – ढोंगी राष्ट्रवादाचा आतंकवाद झुगारण्यासाठी आणि भ्रष्ट, पक्षबदलू, तसेच संधीसाधू यांना अद्दल घडवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन चर्च संस्थेच्या ‘सामाजिक न्याय आणि शांतता मंडळा’ने केले आहे. भारतीय घटनेने दिलेले स्वातंत्र्य आणि निधर्मी मूल्ये यांचे जतन करण्यासाठी देश आणि राज्य यांच्या सर्वांगीण हितासाठी सर्वांनी विवेकशीलतेने मतदान करण्याची आवश्यकता आहे, असे मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आवाहनपत्रात म्हटले आहे. या आवाहनपत्रात अप्रत्यक्षपणे गोव्यातील आणि केंद्रातील भाजपप्रणीत आघाडी शासनावर प्रखर टीका करण्यात आली आहे.

गोव्यात २३ एप्रिल या दिवशी लोकसभेच्या २ जागांसाठी मतदान, तर विधानसभेच्या ३ जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर हे आवाहनपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्च संस्था ख्रिस्ती मतदारांसाठी नेहमी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करत असते.

या आवाहनपत्रात मंडळाचे कार्यकारी सचिव फादर सावियो फर्नांडिस म्हणतात,

१. ‘‘लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी धर्मनिरपेक्षता अन् लोकशाही मूल्ये यांचे जतन करणारे बहुसंख्य सदस्य असणे आवश्यक आहे. (बहुसंख्यांकांना अन्यायाची वागणूक देणारी लोकशाही आणि बहुसंख्यांकांवर अत्याचार होऊ देणारी तथाकथित धर्मनिरपेक्षता काय कामाची ? – संपादक)

२. २३ एप्रिलला सर्वांनी मतदान करून देश आणि राज्य यांचे भवितव्य अबाधित ठेवावे. हल्ली विरोधक आणि समाजिक कार्यकर्ते आदींच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हे नोंद होत आहेत. (विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते देशद्रोही आहेत कि नाहीत, हे चर्चप्रणीत संस्थेने किंवा फादर सावियो यांनी स्वयंघोषित न्यायाधीश बनून न ठरवता ते न्यायालयाला ठरवू द्यावे. त्याआधीच त्यांना निर्दोष ठरवणे, हे जनतेची दिशाभूल करण्यासारखे आणि देशातील लोकशाही आणि न्यायव्यवस्था यांच्यावर अविश्‍वास दाखवण्यासारखे होईल. – संपादक)

३. विरोध करणार्‍यांना ‘राष्ट्रदोही’ आणि ‘शहरी नक्षलवादी’ असे संबोधले जात आहे. (शहरी नक्षलवाद्यांमध्ये काही ख्रिस्ती आहेत आणि माओवाद्यांमध्येही अनेक जण ख्रिस्ती आहेत. त्यामुळेच चर्चप्रणीत संस्थेला त्यांच्याविषयी पुळका आलेला दिसतो. अशी धर्मांध संस्था ख्रिस्त्यांची दिशाभूलच करत आहे. काही हिंदुत्वनिष्ठांना आणि गोरक्षकांना खोट्या आरोपाखाली कारागृहात टाकले आहे. त्यांच्याविषयी चर्च संस्थेला काहीच का वाटत नाही ? याला धर्मांधता म्हणतात. अशा संस्थेने धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करू नयेत ! – संपादक)

४. स्वच्छ आणि निर्णयक्षमता असलेल्या शासनाला अशा पद्धतीने दबावतंत्र आणि आतंक पसरवण्याची आवश्यकता काय? ‘भ्रष्टाचारविरहित आणि घोटाळामुक्त सरकार’ या नावाखाली उघडपणे हिंसा, आतंक आणि खोटारडेपणा यांना प्रोत्साहन मिळत असेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही. (असे एक तरी उदाहरण ‘सामाजिक न्याय आणि शांतता मंडळा’कडे आहे का ? असे खोटे आरोप करणे हाच खोटारडेपणा नाही का ? – संपादक)

५. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून पहिल्यांदाच आयोजित केलेली पत्रकार परिषद, शैक्षणिक तथा इतर सार्वजनिक संस्था यांच्या स्वायत्ततेवर निर्बंध, माध्यमांवर नियंत्रण, लव्ह जिहादची दहशत, गोरक्षक करत असलेली हिंसा, तसेच इतर सांस्कृतिक मूलतत्त्ववाद यांचा गंभीरपणे विचार करावा लागेल. (लव्ह जिहादविषयी उघडपणे सरकारला जाब विचारल्याविषयी ‘सामाजिक न्याय आणि शांतता मंडळा’चे अभिनंदन; पण ख्रिस्ती मिशनरी आणि बिलिव्हर्स यांच्या धर्मांतराच्या कारवायांविषयीही बोलावे. पोलीस कसायांना संरक्षण देत असल्याने आणि कारवाई करत नसल्यानेच गोरक्षकांना कारवाई करावी लागते. हे कसाई गोरक्षकांवर गोळ्या झाडतात, त्यांना मारहाण करतात त्याविषयी चर्चप्रणीत संस्था काहीच का बोलत नाहीत ? हा खोटारडेपणाच आहे. हिंदु संस्कृतीविषयी कोणी आग्रही राहिले, तर त्याला सांस्कृतिक मूलतत्त्ववाद म्हणणे, यासारखा मूलतत्त्ववाद दुसरा कोणता ? – संपादक)

६. राज्यात भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे, म्हणून मतदारांनी राजकीय पक्षांचा इतिहास आणि विचारधारा यांकडे न पहाता नवीन लोकांना पसंती दिली पाहिजे. आमदार जरी चांगले असले, तरी महत्त्वाच्या विषयांवर त्यांना पक्षाचा आदेश मान्य करावाच लागतो आणि त्यामुळे त्यांच्या चांगुलपणाला काहीच अर्थ रहात नाही. यापुढे अशा पक्षांपासून सावध रहावे लागेल. जनतेच्या मतांचा अनादर करून उघडपणे पक्षांतर करण्याचे प्रकार पुन्हा चालू झाले आहेत. पक्षांतरांना लोकशाहीत अजिबात थारा देता कामा नये.’’


Multi Language |Offline reading | PDF