पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण

  • पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्याची मागणी जगातील कोणताही देश करत नाही, हे लक्षात घ्या !
  • भारतासह जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

इस्लामाबाद – पाकच्या सिंध प्रांतात २५ मार्चच्या रात्री आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. ही मुलगी मेघवार समाजातील असून ती बादिन जिल्ह्यातील तांदो बाघो येथे रहाणारी आहे. सिंध सूचना विभागाने प्रसारित केलेल्या पत्रकामध्ये अल्पसंख्यांकांच्या सूत्रांविषयीचे मंत्री हरिराम किशोरी लाल यांनी सांगितले आहे की, १६ वर्षीय हिंदु मुलीच्या अपहरणाविषयीची माहिती सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. त्याची नोंद घेण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यासह गुन्हा नोंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now