ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या प्रकरणी एका मध्यस्थाला अटक

नवी देहली – ३ सहस्र ६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने येथील सुशेन मोहन गुप्ता या मध्यस्थाला अटक केली आहे. गुप्ता याचा ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारासह अनेक संरक्षण व्यवहारात सहभाग होता. यापूर्वी या घोटाळ्याच्या प्रकरणी गौतम खेतान आणि ब्रिटिश नागरिक ख्रिश्‍चियन मिशेल यांना अटक करण्यात आलेली आहे.


Multi Language |Offline reading | PDF