खंडपिठाच्या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील अधिवक्त्यांचा कामकाजावर बहिष्कार !

कोल्हापूर न्यायालय

कोल्हापूर, २६ मार्च (वार्ता.) – कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. खंडपीठ कृती समितीने कोल्हापूर येथे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन चालू केले आहे. १ एप्रिलअखेर हे आंदोलन चालू रहाणार आहे. अनेक पक्षकारांना याविषयी माहिती नसल्याने त्यांना परत जावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. अनेक संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.


Multi Language |Offline reading | PDF