सनातनची अमूल्य ग्रंथसंपदा बेळगाव शहरातील ५ मुख्य वाचनालयात उपलब्ध !

बेळगाव, २६ मार्च (वार्ता.) – श्री. रामय्या जी., डेप्युटी डायरेक्टर, बेळगाव सिटी सेन्ट्रल लायब्ररी, बेळगाव यांच्या विशेष सहकार्यामुळे सनातनची अमूल्य ग्रंथसंपदा शहरातील ५ मुख्य वाचनालयात वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यात कन्नड भाषेतील ६९ ग्रंथांचा एक संच असे एकूण ५ संच म्हणजेच ३४५ ग्रंथ या ग्रंथालयात वाचनालयासाठी त्यांनी विकत घेतले.

बेळगाव सिटी सेन्ट्रल लायब्ररीचे कर्मचारी – ग्रंथांची मोजणी करून घेतांना

बेळगाव सिटी सेन्ट्रल लायब्ररीच्या कक्षेत बेळगाव जिल्ह्यातील २७ ग्रंथालये येतात. ‘या सर्व ग्रंथालयांसाठी आम्ही सनातनचे ग्रंथ उपलब्ध करून देऊ’, असे आश्‍वासन श्री. रामय्या जी. यांनी दिले.


Multi Language |Offline reading | PDF