कत्तल करण्यासाठी आणलेल्या २१ गोवंशियांची धर्मांध कसायांच्या तावडीतून सुटका

तीन धर्मांध पोलिसांच्या कह्यात; तर दोघांचे पलायन

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता सांगणारी घटना !

मोहोळ (जिल्हा सोलापूर) – शहरातील कुरेशी गल्ली येथे कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या २१ गोवंशियांची पोलिसांनी धर्मांध कसायांच्या तावडीतून सुटका केली असून ५ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्यातील तौफिक कुरेशी, अजगरअली कुरेशी, शहानवाज कुरेशी या धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेतले, तर बाबा कुरेशी आणि जहीर कुरेशी अशी पळून गेलेल्या धर्मांधांची नावे आहेत.

मोहोळ पोलिसांना शहरातील कुरेशी गल्ली येथे कसायांनी गोवंशियांना बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी छापा टाकला असता २१ गोवंशीय कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने बांधून ठेवलेले आढळले; तर काही गोवंशियांची कत्तल झाल्याने त्यांचे मांस, शिंगे, कातडी यांसह अन्य अवयव पोलिसांना आढळले. पोलिसांनी २१ गोवंशियांची सुटका करून त्यांना गोशाळेत ठेवले आहे.


Multi Language |Offline reading | PDF