देहली, मुंबई आणि गोवा येथे आतंकवादी आक्रमणाची शक्यता

  • न्यूझीलंडमधील मशिदींवरील गोळीबाराचा सूड घेण्याचा प्रयत्न

  • ज्यू धर्मियांना लक्ष्य करणार

  • जगात कुठेही मुसलमानांवर आक्रमण झाल्यावर त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न जिहादी आतंकवादी करतात, तर हिंदूंवर सतत देशभरात आणि विशेषतः इस्लामी देशांत आक्रमणे होत असतांना हिंदू वैध मार्गानेही या विरोधात आवाज उठवत नाहीत !
  • न्यूझीलंडमधील मुसलमानांवर झालेल्या आक्रमणाचा सूड भारतियांवर उगवण्यास काय हशील आहे ? याचा अर्थ काहीही कारण काढून जिहादी आतंकवाद्यांना हिंदूंना ‘काफीर’ ठरवून ठार मारायचे आहे, हे खरे.

नवी देहली – न्यूझीलंड येथे काही दिवसांपूर्वी २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा सूड घेण्यासाठी देहली, मुंबई आणि गोवा येथे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट इस्लामिक स्टेट आणि आणि अल् कायदा या आतंकवादी संघटना रचत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. (आतंकवाद्यांना न्यूझीलंडपेक्षा भारतात आतंकवादी आक्रमण करणे सोपे जाते, असे समजायचे का ? गुप्तचरांनी माहिती दिल्यानंतरही देशात आतंकवादी आक्रमणे होतात. ती रोखण्यास सुरक्षायंत्रणा अपयशी ठरतात. आताही तसेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक) विशेषतः ज्यू लोकांच्या धर्मस्थळांवर ही आक्रमणे करण्याचा ते कट रचत आहेत. या आक्रमणासाठी आतंकवादी एखाद्या वाहनाचा किंवा चाकूसारख्या हत्याराचा वापर करण्याची शक्यता आहे.

ही माहिती मिळाल्यानंतर इस्रायलचे मुंबईतील दूतावास, ज्यूंची धर्मस्थळे आणि ‘छाबड हाऊस’ या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता अबू हसन अल-मुहाझीर याचा न्यूझीलंडमधील गोळीबाराचा सूड घेण्याचे आवाहन करणारा एक ‘व्हिडिओ’ आतंकवाद्यांचे ‘ऑनलाइन ग्रुप’ आणि विविध ‘चॅट’वर प्रसारित केला आहे. या ‘व्हिडिओ’सह आतंकवादी संघटनांच्या समर्थकांनीही सूड घेण्याला दुजोरा दिलेले ‘व्हिडिओ’ही या ठिकाणी प्रसारित होत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now