पाकमध्ये प्रतिवर्षी अल्पसंख्यांकांच्या १ सहस्र मुलींचे धर्मांतर !

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि महिला संघटना यांना हे दिसत नाही का ? कि त्या आंधळ्या झाल्या आहेत ?

नवी देहली – ‘युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहम’च्या एका अभ्यासामध्ये ‘औरत फाउंडेशन’ आणि ‘मुव्हमेंट फॉर सॉलिडेरिटी अ‍ॅण्ड पीस’ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानात प्रतिवर्षी अल्पसंख्यांकांच्या १ सहस्र महिला आणि मुली यांचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केले जाते. त्यानंतर त्यांचा मुसलमान तरुणांशी विवाह लावून दिला जातो.

१. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाचे माजी उपाध्यक्ष अमरनाथ मौतुल यांनी सांगितले की, प्रतिमास येथे २० हून अधिक हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केले जाते. महिलांच्या विरोधात होणारा भेदभाव आणि त्यांना अधिकार देण्याच्या आंतरराष्ट्रीय करारावर पाकने स्वाक्षरी केली आहे; मात्र तरीही ही स्थिती आहे. या कराराच्या १६ व्या नियमात म्हटले आहे की, एखाद्या मुलीचा विवाह तिच्या सहमतीनेच केला पाहिजे. पाकमध्ये बालकांनाही काही अधिकार लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार मुलांच्या धर्मस्वातंत्र्याचा सन्मान करणे आवश्यक आहे.

२. पाकमधील भारतीय दूतावासाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार सिंध प्रांतात हिंदु मुलींचे अपहरण आणि त्यांचे धर्मांतर करणे या नेहमीच्या घटना झाल्या आहेत. (हे भारतीय दूतावासाला ठाऊक आहे; मात्र भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ? तरीही त्यांनी गेल्या ५ वर्षांत या संदर्भात काहीच केले नाही, हे लक्षात येते ! – संपादक)

३. पाकमधील हिंदू सेवा वेल्फेअर ट्रस्टचे प्रमुख संजेश धांजा यांनी सांगितले की, मार्चमध्येच हिंदु मुलींचे अपहरण होण्याच्या आतापर्यंत ६ घटना घडल्या आहेत.

४. काही आठवड्यांपूर्वी पाकमधील हिंदु खासदार डॉ. रमेशकुमार वाकवानी यांनी हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर रोखण्यासाठी हिंदु विवाह कायदा करण्याची मागणी केली होती. ‘हिंदु मुलींचे अपहरण केल्यावर त्यांना त्यांच्या सुटकेसाठी इस्लाम स्वीकारण्यास सांगितले जाते. इस्लाम स्वीकारल्यावर मुलींची सुटका न करता त्यांचा विवाह लावून दिला जातो. हिंदु विवाह कायदा केल्यास अशा घटना रोखता येऊ शकतात’, असे ते म्हणाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now